Back

NSS

आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब,लांजा आणि आयुषमान हॉस्पिटल लांजा यांचे वतीने वेणी खुर्द मध्ये आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले. यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील शर्करा , रक्तदाब, ईसीजी इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या .एकूण 90 रुग्णांनी याचा लाभ घेतला.

लांजा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज ग्रंथ संकलन ना मध्ये जमा झालेल्या 98 पुस्तकांनी तालुक्यातील झाशीच्या राणीचे गाव कोट येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आले.

चिपळूण येथील पेठ माप भागांमध्ये आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आजी आणि माजी अशा 18 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागातील चिखल गाळ काढून ग्रामस्थांना मदत केली